पंढरपूर विठ्ठल मंदिरामध्ये पुरातन ठेवा सापडलेल्या विष्णू बालाजी रूपातील एक मूर्ती आणि देवीची एक मूर्ती सापडली. गाभाऱ्यासमोरील दगड बाजूला करताना एक तळघळ सापडले . तसेच विठ्ठल मंदिरामध्ये आणि त्यामध्ये पुरातत्त्व विभागाचे अधिकारी ते तळ उघडून त्याच्या आत प्रवेश केला. पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने व तेजस्विनी आफळे तळघर उघडून आत गेले असता त्यांना असे आढळून आले की जवळपास 1500 व्या शतकापासुनच्या काळातील ह्या जुन्या मुर्त्ता असल्याचा त्यांचा अंदाज आहे. जेव्हा विठ्ठल मंदिर बांधण्यात आलं तेव्हापासूनच हे तळघळ बांधण्यात आलं असा संशोधकांचा अंदाज आहे अजूनही तिथे शोध कार्य चालू आहे सुरुवातीला सहा फूट लांब असा हा तळघर असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता परंतु ते दहा फूट आहे असे कळण्यात आले.
इसवी सन 1111 किंवा 1179 साली तिथे विठ्ठल देवनायक नावाच्या एका सम्राटाचा सामंत होता त्याने छोटस मंदिर बांधलं त्यामुळे हे बाराव्या शतकातला तळघर नाही असं कळण्यात आल.
मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम
पंढरपूरचा विठ्ठल मंदिर 700 वर्षांपूर्वीच्या मूळ रूपामध्ये आता भावी नागरिकांना पाहायला मिळणारे या मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. मंदिरावर केलेले रंगकाम हे आता काढून टाकण्यात आलेले आहे त्यामुळे त्या मंदिराचे मूळ दगडी काम हे आता समोर आलेले आहे त्यामुळे जुन्या पद्धतीचे मंदिराचे रूप किती सुंदर असेल हे आता आपल्याला त्यामधून पहायला मिळत आहे. विठ्ठल मंदिराचे हे सौंदर्य पाहताच जुन्या मंदिराचे आपल्याला आठवण येईल. सातशे वर्षाचं हे जुनं मंदिर आपल्याला आता मूळ रूपात पाहायला मिळत आहे. मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये हे काम कशाप्रकारे सुरू आहे त्याचं मूळ रूप हे कसं दिसतं हे आपण या फोटोमध्ये पाहू सुळखांबे मधले हे खांबावरच्या जे काय रंग होते व काही इतर गोष्टी होत्या त्यावरनं काढण्यात आले आहेत खांबावरचं दगडी खांब जे आहेत त्यामुळे त्यावरचं मूळ रूप हे उठून दिसण्यात येत आहे.
विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडलेल्या प्राचीन मूर्त्या
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या काही प्राचीन मूर्त्या, तर कश्या दिसतात ह्या मूर्त्या ते आपण फोटो मधून पाहूया. महाराष्ट्रातल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर या गावांमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात मूळ रूप जेव्हा भाविकांच्या समोर आले .तेव्हा त्यामध्ये एक तळघर सापडले हनुमान दरवाजाच्या खाली एक तळघर सापडले तेव्हा तिथे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली तेव्हा त्यांना मुर्त्या आढळून आल्यात जवळजवळ सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या दगडी मुर्त्या आणि नाणी बाहेर काढण्यात आली त्यात एक चतुर्भुज पुरातन मूर्ती सुद्धा बाहेर काढण्यात आली.
विठ्ठलाची ही हीच मूळ मूर्ती आहे का ? असा आता प्रश्न भाविकांना पडला आहे. त्यामुळेआता प्रश्न पडण्यात आले आहेत की आक्रमणापासून संरक्षण पर्यंत ह्या मूर्त्या लपवलेल्या होत्या का ? त्यामुळे त्यावर अजूनही मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे की, नक्की कोणत्या काळापासून ही मूर्ती ह्या तळघरामध्ये आहे ज्याचा शोध आता लागलाय त्याबद्दल काहीही कल्पना नाही.