17 खासदार महायुतीचे निवडून आले ते फक्त राज साहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्यांमुळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे..

तिसऱ्यांदा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहिर केला.

९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पार्क शिवतीर्थ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झालेल्या जाहीर सभेमध्ये राज साहेब ठाकरे यांनी तिसऱ्यांदा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत,यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहिर केला आणि त्या दिवासापासून राज साहेबांचा आदेश मानून महाराष्ट्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर्व कार्यकर्ते ,पदाधिकारी व सहकाऱ्यांनी दिवस रात्र महाराष्ट्रातील सर्व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महायुतीच्या उमेद‌वारांना किंवा त्यांचा लोकांना बरोबर घेऊन संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रचार केला. म्हणूनच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी सहकारी कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीचे 17 खासदार निवडून आलेले आहेत.राज साहेब ठाकरे

 

महायुतीचे खासदार हे एक लाखांपेक्षा थोड्याफार फरकाने विजयी झाले.

महायुती महणजेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे तिघांचे मिळून एकूण 17 उमेदवार म्हणजेच 17 खासदार निवडून आले. त्या सर्वांचे मनसेने अभिनंदन केले, पण सर्व खासदार निवडून आले. ते फक्त महाराष्ट्र निर्माण सेनेचा अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचामुळे , कारण महायुतीचे खासदार हे एक लाखांपेक्षा थोड्याफार फरकाने विजयी झाले आहेत .अनेक महायुतीचे उमेदवार तर 48 मतापासून ते 50 हजाराच्या आसपासच्या फरकाने विजयी झाले.

लोकांना प्रश्न पडला असेल की मग हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच कसे निवडून आले?

त्याचे उत्तर खालील प्रमाणे आहे.

2019 साली जी विधानसभेची निवडनुक महाराष्ट्र नवनिर्माण सनेने लढवली होती. त्या निवडणूकीमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये कमीत कमी दहा हजार ते राजू दादा पाटील मनसेचे आमदार यांना एक लाखा पर्यंत मते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मिळाले होते. अनेक विधानसभा मतदार संघांमध्ये 30 हजार, 40 हजार तर पुण्यातून किशोर शिंदे यांना 90 हजार मते मिळाली होती. तसेच अविनाश जाधव यांना सुद्धा 75 हजार मते मिळाली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढलेलीच आहे. याचाच अर्थ असा होतो की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रत्येक विधानसभेमध्ये कमीत कमी पंधरा हजार मते पकडली, तर एका लोकसभा मतदारसंघांमध्ये 75000 मते होतात. तर 75000 मतापासून ते 2 लाख पर्यंत ही मते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विविध लोकसभा मतदारसंघात आहेत.

हे कोणीही मान्य करेल.

जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढली असती, तर निकाला वेगळा लागला असूता. कारण या निकालावरून तसेच दिसत आहे.यामुळेच महायुतीचे महाराष्ट्रातले जे काही खासदार निवडून आलेले आहेत .ते फक्त माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचामुळेच निवडून आले आहेत आणि हे महायुतीने विसरता कामा नये.

1)कल्याण –
1) श्रीकांत शिंदे – 589636
2) वैशाली दरेकर – 380492
209144 मतांनी श्रीकांत शिंदे विजयी

2)ठाणे
1) नरेश मस्के – 734231
2) राजन विचारे – 517220
217011 मतांनी नरेश मस्के विजयी

3)उत्तर मुंबई
1) पियुष गोयल – 680146
2) भूषण पाटील – 322538
357608 मतांनी पियुष गोयल विजयी

4)मुंबई उत्तर पश्चिम
1) रवींद्र वायकर – 452644
2) अमोल कीर्तिकर – 452596
48 मतांनी रवींद्र वायकर विजयी

5)रायगड
1)सुनील तटकरे – 508352
2) अनंत गीते – 425568
82784 मतांनी सुनील तटकरे विजयी

6)मावळ
1) श्रीरंग बारणे – 692832.
2) संजोग वाघेरे – 596217
96615 मतांनी श्रीरंग बारणे विजयी

7)पुणे
1) मुरलीधर मोहळ – 584278
2) रवींद्र धंगेकर – 461690
122588 मतांनी मुरलीधर मोहळ विजयी

8)सातारा
1) उदयनराजे भोसले – 571666
2) शशिकांत शिंदे – 538363
33303 मतांनी उदयन राजे भोसले विजयी

9)रत्नागिरी
1) नारायण राणे – 448514
2) विनायक राऊत – 400650
47858 मतांनी नारायण राणे विजयी

10)हातकणंगले
1 ) धर्यशील माने – 520190
2 ) सत्यजित पाटील – 506764
13426 मतांनी धैर्यशील माने विजयी

11)बुलढाणा
1) प्रतापराव जाधव – 349867
2) नरेंद्र खेडेकर – 320388
29479 मतांनी प्रतापराव जाधव विजयी

12)अकोला
1) अनुप धोत्रे – 457030
2) डॉ अभय पाटील – 416404
40662 मतांनी अनुप धोत्रे विजयी

13)नागपूर
1) नितीन गडकरी – 655027
2) विकास ठाकरे – 517424
137603 मतांनी नितीन गडकरी विजयी

14) संभाजी नगर
1) संदीपान भुमरे – 474434..
2) इम्तियाज जलील – 340877
133557 मतांनी संदीपान भुमरे विजयी

15)पालघर
1) डॉ हेमंत सवरा -601244
2) भारती कामडी – 417938
183306 मतांनी डॉ हेमंत सवरा विजयी

16)जळगाव
1) स्मिता वाघ – 674428
2) उन्मेष पाटील -422834
251594 मतांनी स्मिता वाघ विजयी

17)रावेर
1) रक्षा खडसे – 630879
2) श्रीराम पाटील – 358696
272183 मतांनी रक्षा खडसे विजयी

 

Leave a Comment